शिक्षण विभागातील बाजारीकरण चव्हाट्यावर, शिक्षण आयुक्तांचा लेटर बाँब; ACB ला थेट पत्र

शिक्षण विभागातील बाजारीकरण चव्हाट्यावर, शिक्षण आयुक्तांचा लेटर बाँब; ACB ला थेट पत्र

| Updated on: Jun 07, 2023 | 6:57 AM

VIDEO | अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्तांचं एसीबीला पत्र, काय केली मागणी?

पुणे : नाशिकमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नुकतीच मोठी कारवाई केली. त्यामध्ये नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजाराची तर लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी लेटर बाँब टाकला आहे. त्यांनी राज्यातील ७२ अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केली आहे, त्यात ३६ शिक्षणाधिकारी असल्याचे म्हटले जात आहे. शिक्षण विभागातील ८२ अधिकाऱ्यांची खुली चौकशी करा, अशी मागणी खुद्द शिक्षण आयुक्तांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी अँटी करप्शन ब्युरोला पत्र दिले आहे. या पत्रात ७२ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराबाबत स्वतः आयुक्तांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे कौतूक होत आहे. शिक्षण आयुक्तांच्या या मागणीमुळे शिक्षण विभागातील बाजारीकरण चव्हाट्यावर आले आहे. त्याचवेळी अनेकांचे धाबे दणाणले आहे. या चौकशीतून शिक्षण विभागातील मोठे गैर व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 07, 2023 06:57 AM