नितीन देसाई यांचे ‘त्या’ ११ ऑडिओ क्लिप ऐकून पत्नी नेहा यांची पोलिसांत तक्रार, काय केले आरोप?
VIDEO | नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांचा पोलिसांकडे धक्कादायक जबाब, काय केली तक्रार? खरे गुन्हेगार कोण?
मुंबई, ५ ऑगस्ट, २०२३ | ज्येष्ठ कला दिग्दर्शन नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी रायगड पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. या जबाबात त्यांनी एडलवाईज कंपनीवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. नेहा देसाई यांनी आपल्या जबाबात एनडी स्टुडिओच्या जन्मापासून ते नितीन देसाई यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयापर्यंतच्या विविध घडामोडींवर उघडपणे भाष्य केलं आहे. याबाबतची एक्सक्लुझिव्ह माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. “2004 साली कर्जतच्या हातनोली नाका येथे एनडी स्टुडिओची स्थापना केल्यानंतर स्टुडिओच्या कामकाजासाठी आम्ही सुरुवातीला अडीच लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड आम्ही मुदतीत केली आहे. त्यानंतर आम्ही स्टुडिओच्या कामाकरता आवश्यकतेनुसार कर्ज घेतले असून त्यांची देखील मुदतीत परतफेड केलेली आहे. त्यामुळे माझे पती नितीन देसाई यांचा कर्ज घेऊन फसवण्याचा कधीच हेतू नव्हता”, असं नेहा देसाई यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.
“माझे पती फायनान्स कंपनीचे कर्ज फेडण्याची तयारी दाखवत असून सुद्धा फायनान्स कंपनीचे केवळ मेहता, रशिद शहा, स्मित शहा कंपनीचे आर के बंसल आणि प्रशासक जितेंद्र कोठारी यांनी स्टुडिओच्या कर्जाच्या वसुली करता माझे पती यांना प्रचंड मानसिक त्रास दिला या मानसिक त्रासाला कंटाळून माझे पती यांची इच्छा नसतानाही त्यांनी आत्महत्या करण्यास भाग पाडले म्हणून वरील इसमान विरोधात माझी कायदेशीर तक्रार आहे.”, असे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.