रत्नागिरी -दापोली मार्गावर धावणाऱ्या एसटीवर दगडफेक

रत्नागिरी -दापोली मार्गावर धावणाऱ्या एसटीवर दगडफेक

| Updated on: Nov 28, 2021 | 11:18 AM

रत्नागिरी -खेड-दापोली मार्गावर धावणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीनंतर हा व्यक्ती फरार झाला आहे. दरम्यान सध्या या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रत्नागिरी : रत्नागिरी -खेड-दापोली मार्गावर धावणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीनंतर हा व्यक्ती फरार झाला आहे. दरम्यान सध्या या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्य सरकारने दिलेल्या वेतन वाढीनंतर  काही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामाला सुरुवात केली आहे. मात्र काही जण अद्यापही संपावर ठाम आहेत, याच पार्श्वभूमीतून ही दगडफेक झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.