भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशावर सुभाष देसाई म्हणाले, 'ही घटना माझ्यासाठी...'

भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशावर सुभाष देसाई म्हणाले, ‘ही घटना माझ्यासाठी…’

| Updated on: Mar 13, 2023 | 9:35 PM

VIDEO | भूषण देसाई यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर सुभाष देसाई यांची मोठी प्रतिक्रिया, बघा काय म्हणाले

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, भूषण देसाई यांचे वडील आणि नेते सुभाष देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.’, असे म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे आणि मातोश्रीशी गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच कायम राहणार असल्याचेही सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 13, 2023 09:35 PM