'शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ४०० रूपये न मिळाल्यास...', राजू शेट्टी आक्रमक, काय केला आरोप?

‘शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ४०० रूपये न मिळाल्यास…’, राजू शेट्टी आक्रमक, काय केला आरोप?

| Updated on: Sep 13, 2023 | 5:28 PM

VIDEO | कोल्हापुरात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, काय केली राज्य सरकारकडे मागणी अन् काय केले आरोप?

कोल्हापूर, १३ सप्टेंबर २०२३ | गेल्या हंगामात गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रूपये इतका हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा, याकरता आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार यांच्या नेतृत्वात आज झालेल्या मोर्चाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. राज्य शासन कोणत्याच बाबतीत गंभीर नसल्याचे म्हणत ऊसाचा एफआरपी आणि प्रतिटन ४०० रूपये देण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक ४०० रूपये इतकी दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजे, अन्यथा साखर कारखान्यांची धुराडी पेटवू देणार नाही, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे. अजित पवार यांनी काय आश्वासनं दिले माहित नाही. पण आम्ही ४०० रूपये घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Sep 13, 2023 05:26 PM