VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 26 july 2022
कोर्टात सुनावणी सुरु असताना निवडणुक आयोगाचा हस्तक्षेप कशाला असा सूर शिवसेनेमध्ये होता. त्याच अनुशंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. तर केंद्रीय यंत्रणा कशा काम करतात याचे दाखले खा. संजय राऊत यांनी दिले होते.
शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात एकच गोंधळ सुरू आहे. राज्यात मोठा सत्तासंघर्ष देखील बघायला मिळाला शिवसेना कोणाची ? यावरुन कोर्टात प्रकरण सुरु आहे. असे असतानाच केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला 9 ऑगस्ट दुपारी 1 पर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोर्टात सुनावणी सुरु असताना निवडणुक आयोगाचा हस्तक्षेप कशाला असा सूर शिवसेनेमध्ये होता. त्याच अनुशंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. तर केंद्रीय यंत्रणा कशा काम करतात याचे दाखले खा. संजय राऊत यांनी दिले होते. त्यामुळे शिवसेनेने जी याचिका कार्टात दाखल केली होती त्याला स्विकारण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
Published on: Jul 26, 2022 02:58 PM
Latest Videos