सुप्रिया सुळे यांनी सांगितलं लोकसभेतून निलंबित करण्याचं कारण; म्हणाल्या, फक्त एक उत्तर मागितलं…
Supriya Sule Lok Sabha Disqualification News in Marathi दोन दिवसांत 92 खासदारांना निलंबित केल्यानंतर मंगळवारी आणखी काही खासदारांना निलंबित केले. यामध्ये काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांच्यापासून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि सपाच्या डिंपल यादव यांचा समावेश
नवी दिल्ली, १९ डिसेंबर २०२३ : संसदेच्या सुरक्षेबाबत झालेल्या गदारोळामुळे खासदारांचे निलंबन अद्याप सुरूच आहे. दोन दिवसांत 92 खासदारांना निलंबित केल्यानंतर मंगळवारी आणखी काही खासदारांना निलंबित केले. यामध्ये काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांच्यापासून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि सपाच्या डिंपल यादव यांचा समावेश आहे. एक दिवस आधी संसदेत असभ्य वर्तन केल्याबद्दल खासदारांना निलंबित करण्यात आले होते त्यामुळे आता एकूण 92 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश होता. या निलंबनाच्या कारवाईवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे…