ईडी सरकारला महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर…, कोश्यारी यांच्यावर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
VIDEO | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य करून गरळ ओकत होते, त्यावेळी जरा जरी ईडी सरकारला महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर त्यांनी राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती तात्काळ केंद्राला केली असती. परंतु आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्याची ईडी सरकारने केलेली खेळी आहे, ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली खेळी असून जनतेच्या आहत झालेल्या अस्मितेला मलमपट्टी लावण्याचा प्रकार असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.