संसद सुरक्षेवरून वाद, नंतर निलंबन...आता मिमिक्रीचा गदारोळ, कुणी केली उपराष्ट्रपतींची नक्कल?

संसद सुरक्षेवरून वाद, नंतर निलंबन…आता मिमिक्रीचा गदारोळ, कुणी केली उपराष्ट्रपतींची नक्कल?

| Updated on: Dec 21, 2023 | 10:43 AM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि विरोधक यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद रंगला. संसदेत शिरून ज्या लोकांनी घुसखोरी केली, त्यावरून सखोल चर्चा व्हावी. त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं, यासाठी विरोधक अडून बसले.

मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : संसदेच्या सुरक्षेवर चर्चा करा, यावरून झालेल्या वादावरून आधी निलंबन झालं. त्यानंतर आता उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यापूर्वीही उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि विरोधक यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद रंगला. संसदेत शिरून ज्या लोकांनी घुसखोरी केली, त्यावरून सखोल चर्चा व्हावी. त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं, यासाठी विरोधक अडून बसले. सरकारने विरोधक गोंधळ घालत असल्याने दोन दिवसात १४१ खासदारांचं निलंबन केलं. निलंबिंत खासदार संसद परिसरात जमले. यावेळी तृणमूलच्या कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची नक्कल केली. याचं शूट राहुल गांधी यांनी केलं. यावरून स्वतः उपराष्ट्रपती यांनी विरोधकांच्या या कृतीवर नक्कल केली. मात्र सत्ताधारी निलंबनापासून लक्ष हटवण्यासाठी हा मुद्दा पुढे करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

Published on: Dec 21, 2023 10:43 AM