Raju Shetti : मला हुतात्मा व्हायला आवडेल…राजू शेट्टी असं का म्हणाले?
राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावरुन तुमचा दत्ता सामंत करु अशी धमकी मिळाल्याची माहिती जालिंदर पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सभेत बोलताना दिली. तर या धमकीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, माझा दत्ता सामंत करायचं कुणी ठरवलं तर मला हुतात्मा व्हायला आवडेल
कोल्हापूर, ७ नोव्हेंबर २०२३ | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सोशल मिडीयावरून धमकी देण्यात आली. राजू शेट्टी यांना धमकी आल्याची खळबळजनक माहिती स्वाभिमानी संघटनेचे नेते जालिंदर पाटील यांनी दिली. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २२ व्या ऊस परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावरुन तुमचा दत्ता सामंत करु अशी धमकी मिळाल्याची माहिती जालिंदर पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २२ व्या ऊस परिषदेच्या सभेत बोलताना दिली. तर या धमकीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, माझा दत्ता सामंत करायचं कुणी ठरवलं तर मला हुतात्मा व्हायला आवडेल. या धमकीची मला भिती वाटत नाही. मी लोकांच्या गराड्यात राहणारा , धमकीची भीती वाटत नाही.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर

