IND vs AUS : घरच्या मैदानावर World Cup 2023 चं अंतिम युद्ध जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही तगड्या संघात आज महामुकाबला पाहायला मिळणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे. तर जेते पदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेण्यासाठी टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू आता सज्ज आहे
अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३ : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही तगड्या संघात आज महामुकाबला पाहायला मिळणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे. तर जेते पदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेण्यासाठी टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू आता सज्ज झाला आहे. तर टीम इंडिया आता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अवघ्या काही वेळातच दाखल होत आहे. आतापर्यंत भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. अगदी आजही कंगारूवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली आहे. तर विश्वचषकावर टीम इंडिया आपलं नाव कोरणार, असा विश्वास प्रत्येक भारतीयाला आहे. तर आतापर्यंत भारतीय संघानं एकही सामना हरला नसल्याने भारताचं पारडं जड आहे. त्यामुळे आजच्या फायनल सामन्याकडे साऱ्याचं लक्ष लागले आहे.

'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?

'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
