Ravikant Tupkar : ... तर तुम्ही आमच्या दारात पाय ठेवायचा नाही, शेतकरी नेत्याचा सरकारला इशारा काय?

Ravikant Tupkar : … तर तुम्ही आमच्या दारात पाय ठेवायचा नाही, शेतकरी नेत्याचा सरकारला इशारा काय?

| Updated on: Oct 26, 2023 | 1:40 PM

VIDEO | आज सोयाबीनला उत्पादन खर्चाइतकीदेखील किंमत मिळत नाही. सोयाबीनसह कापून धान, संत्र्यांच्या पिकाची तीच आवस्था आहे. म्हणून एकरी सरसकट १० हजार रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा...सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा इशारा

नागपूर, २६ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे. या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. रविकांत तुपकर आक्रमक होत म्हणाले, मराठा आंदोलकांप्रमाणे शेतकरी संघटनाही नेत्यांना गावबंदी करणार आहे. मराठा समाज बहुतांश प्रमाणात शेती करतो. शेतीच्या शोषणातून मराठा समाजाची दुरावस्था झाली आहे. मराठ्यांनी घेतलेला गावबंदीचा निर्णय योग्य आहे. कापूस आणि सोयाबीन दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाला आहे. तर आज सोयाबीनला उत्पादन खर्चाइतकीदेखील किंमत मिळत नाही. सोयाबीनसह कापून धान, संत्र्यांच्या पिकाची तीच आवस्था आहे. म्हणून एकरी सरसकट १० हजार रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. जर मागणी मान्य झाली नाही तर नेत्यांना आम्ही गावबंदी करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

Published on: Oct 26, 2023 01:40 PM