नितेश राणे यांनी केलेले ‘ते’ गंभीर आरोप सुधाकर बडगुजर यांनी फेटाळले; म्हणाले, माझा संबंध…
विधानसभेत आज भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी करत सुधाकर बडगुजर यांचा थेट दहशतवाद्याथीच संबंध असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या गंभीर आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत फेटाळले
नाशिक, १५ डिसेंबर २०२३ : १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत आज भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी करत सुधाकर बडगुजर यांचा थेट दहशतवाद्याथीच संबंध असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या गंभीर आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेले सर्व गंभीर आरोप फेटाळून लावले आहेत. सार्वजनिक जीवनात वावरत असताना सलीम कुत्ताशी कुठे तरी भेट झाली आहे. मला ते आठवत नाही. किंवा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ मॉर्फिंग केलेला असावा असे म्हटले. तर हे आरोप फेटाळत असताना पालकमंत्र्यांवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.