‘… तर २०२४ ला फडणवीस यांचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही’, कुणी दिला इशारा?
VIDEO | भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कोळी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसलं असल्याची ठाकरे गट युवासेना राज्यविस्तारक शरद कोळी यांनी केली घणाघाती टीका, बघा व्हिडीओ
सोलापूर, २४ सप्टेंबर २०२३ | भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कोळी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसलं असल्याची घणाघाती टीका ठाकरे गट युवासेना राज्यविस्तारक शरद कोळी यांनी केली. तर ‘कोळी समाज जातीला सरसकट कुठली चौकशी न करता, कोणतीही कागदपत्र न मागता, महादेव कोळी समाजाला जातीचे दाखले देण्यात यावे अन्यथा २०२४ ला फडणवीस सरकार महाराष्ट्रात पाडू’, अशी मागणी करत शरद कोळी यांनी केली महादेव कोळी समाजाचा निर्धार बोलून दाखवला. तर गेली अनेक वर्ष राज्यातील अन्यायग्रस्त महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमात आपल्या जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रासाठी झगडत आहे. परंतु आजपर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांनी कोळी जमातीचा प्रश्न सोडवला नाही, त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे. आगामी काळात लोकशाही पद्धतीने हा समाज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे म्हणत शरद कोळी यांनी थेट इशारा दिला आहे.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..

सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'

कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
