Big Breaking : ठाकरे गटाच्या नेत्यावर ED ची धाड, 88 लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त, काय आहे प्रकरण?
कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीने सूरज चव्हाण यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे. सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ८८ लाख ५१ हजारांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील एक फ्लॅट आणि रत्नागिरीतील जमीन ईडीकडून जप्त
मुंबई, १६ मार्च २०२४ : ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या कचाट्यात सापडल्याची बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांची संपत्ती ईडी कडून जप्त करण्यात आली आहे. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीने सूरज चव्हाण यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे. सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ८८ लाख ५१ हजारांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील एक फ्लॅट आणि रत्नागिरीतील जमीन ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर २०२३ मध्ये याप्रकरणासंबंधित गुन्हा दाखल केला होता. खिचडी वितरणात ६ कोटी ३७ लाख रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी सप्टेंबरमहिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामध्ये फसवणूक, फौजदारी, विश्वासघात, कट रचणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला गेला असल्याची माहिती आहे.