‘सुषमा अंधारे, राखी सावंत दोघी बहिणी अन्...', भाजप नेत्याच्या टीकेवरून पुन्हा वाद पेटणार?

‘सुषमा अंधारे, राखी सावंत दोघी बहिणी अन्…’, भाजप नेत्याच्या टीकेवरून पुन्हा वाद पेटणार?

| Updated on: Apr 06, 2023 | 6:22 PM

VIDEO | 'सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं', भाजप नेत्याच्या टीकेवरून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटणार?

मुंबई : एका भाजप नेत्याने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची तुलना सिने अभिनेत्री राखी सावंत हिच्याशी केली असून जहरी टीका केली आहे. दोघी बहिणी बहिणी असून एकमेकींच्या प्रतिस्पर्धीदेखील आहेत, असं वक्तव्य भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलंय. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्याच बनल्या आहेत. शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर त्या जोरदार टीका करत असल्याने बऱ्याचदा त्या चर्चेत असतात. सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं … एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में…..दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा सनसनी कौन मचाई गा ! राखी सावंत ही अभिनेत्रीदेखील अनेक वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असते. त्याप्रमाणेच सुषमा अंधारेदेखील सनसनी वक्तव्यांतून चर्चेत असतात, अशा आशयाचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे.

Published on: Apr 06, 2023 06:18 PM