विजयकुमार गावित यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘गावित यांचं वक्तव्य म्हणजे…’
VIDEO | राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित पुन्हा चर्चेत, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सडकून टीका, म्हणाल्या...विजयकुमार गावित यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्य आहे.
पुणे, २१ ऑगस्ट २०२३ | राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित हे त्यांच्या अनोख्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. यावरूनच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ‘हा महाराष्ट्र शिवछत्रपती, शाहू ,फुले, आंबेडकर यांचा आहे. शिवछत्रपती, शाहू ,फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येक मावळ्यांनी प्रयत्न केले आहेत. अशातच राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्य आहे.’ पुढे त्या असेही म्हणाले, मंत्री महोदयांनी विकास कामांची आणि महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्याची वक्तव्य केली तर ती अधिक उपयुक्त असतील. त्यामुळे विनाकारण बाश्कल बडबड करत गावितांनी निष्कारण चर्चा वाढवू नये. ‘दररोज मासे खाल्ल्यानं ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल तर तुमचेही डोळे सुंदर होतील. त्यानंतर तुम्ही ज्याला पटवायचं त्याला पटवा’,असे गावित म्हणाले होते.