Sushma Andhare : 'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला काय म्हणायचं?', अंधारेंनी पत्राद्वारे सुजय विखेंना सुनावलं

Sushma Andhare : ‘भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला काय म्हणायचं?’, अंधारेंनी पत्राद्वारे सुजय विखेंना सुनावलं

| Updated on: Jan 06, 2025 | 12:35 PM

माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय. महाराष्ट्रातले भिकारी शिर्डीत येतात आणि मोफत जेवण जेवतात, असं वक्तव्य सुजय विखे यांनी केलंय. दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकीय नेते आणि भाविकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच सुजय विखे पाटलांना पत्र आहे. साईभक्तांना भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे असं अंधारे यांनी या पत्रामध्ये म्हटलंय. तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना मोफत शिकवता का? असं देखील सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीमध्ये दारोदार मतं मागितली तुम्हाला काय म्हणायचं आहे? असा सवाल अंधारे यांनी या पत्रातून विचारले आहे. तर शिर्डीमध्ये धनड्य लोकसुद्धा रांगेमध्ये उभे राहून मोठ्या श्रद्धेने हा प्रसाद घेतात. मात्र भक्तांना भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे. तुमच्या अनेक मोठ्या शिक्षण संस्था इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना मोफत शिकवता का? तुमच्या प्रत्येक युनिटमध्ये अगदी चौथी पाचवीच्या मुलांना सुद्धा एक ते दीड लाख रुपये शुल्क आकारले जातं. त्याच निवासी शाळांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पाच ते सात हजार रुपयांवर राबवून घेतलं जातं. तुमचा आक्षेप मोफत भोजन देण्यावर की या संपूर्ण व्यवस्थेवर तुम्हाला पूर्णतः नियंत्रण मिळवता येत नाही यावर. भक्तांना भिकारी म्हणालात मग निवडणुकीच्या काळामध्ये लोकांकडे मतं मागणारे तुम्ही तुम्हाला काय म्हणायचं आहे? असा थेट सवालही अंधारेंनी केलायच.  सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर सुजय विखे पाटील यांना एक जाहीर पत्र लिहून त्यांना त्यांच्या विधानावरून थेट सुनावलं आहे.

Published on: Jan 06, 2025 12:35 PM