बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी कमीच बोलावं, महिला खासदारानं दिला सल्ला
पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांना बळीचा बकरा केल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी करत नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. यावरच ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय
नवी दिल्ली, ८ डिसेंबर २०२३ : पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांना बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी करत नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. यावरच ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर देत नीलम गोऱ्हे यांना फटकारलं आहे. उपसभापती पदासाठी नीलम गोऱ्हे यांच्याकडून उतारवयात गद्दारी केली आहे, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी यांच्यावर टीका केली. तर बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी कमीच बोलावं, असा खोचक सल्ला देत त्यांनी हा इशाराच नीलम गोऱ्हे यांना दिला आहे. प्रियंका चतुर्वेदी पुढे असेही म्हणाल्या, उपसभापतीच्या खुर्चीसाठी तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय, ज्यांनी तुम्हाला नेहमीच पाठिंबा दिलाय. त्यामुळे मी पण बोलायला लागले तर विषय खूप दूरवर जाईल, म्हणून त्यांनी थोडं कमीच बोलावं तेच योग्य राहिल. ज्यांना सगळं मिळालं आज ते बकरी सारखं मैं-मैं करताय त्यांनी दुसऱ्यांना बळीचा बकरा न बोललेलंच बरं..असेही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न

भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं

पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला

MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
