महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो, कोणी केली जहरी टीका?
VIDEO | राज्यातील टोल दरवाढीवर एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो असल्याचे म्हणत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज ठाकरे यांच्या मनसेवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली, ८ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकीकडे राज्यातील टोल दरवाढीवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो असल्याची जहरी टीका उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे तर राज्यातील विशेषतः मुंबईतील पाच टोल नाक्यावरील टोल दरवाढीवरून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर प्रियंका चतुर्वेदी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो आहे. झिरो अधिक झिरो बरोबर त्याचं उत्तर झिरोच येणार आहे. राज्यात कितीपण मोठी महायुती बनू देत, किंवा मनसे सारखे जे संधी साधू लोकं आहेत. जे सत्तेच्या लालसेपोटी महायुतीमध्ये ते एकत्र आलेत. हे जनता बघत आहे’, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी टीकास्त्र डागले आहेत.