अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी नेमकं काय घडलं?

अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच… पण त्याआधी नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 25, 2024 | 11:28 AM

बदलापूरच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सरकार पुरस्कृत दहशतवाद म्हटलंय. आधी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नेमका कसा झाला ते समजून घ्या. सोमवारी संध्याकाळी साडे 5 वाजता ठाणे क्राईम ब्रांचच्या टीमनं आरोपी अक्षय शिंदेचा ताबा घेतला. संजय शिंदेंनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकी घटना कशी घडली, याची माहिती दिलीय.

बलात्कार प्रकरणातील आरोपी, अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. त्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सवाल केलेत. सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका अंधारेंनी केलीय. बदलापुरातील 2 चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे नवी मुंबईच्या तळोजा सेंट्रल जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. मात्र आणखी एका गुन्ह्याच्या प्रकरणात ठाणे क्राईम ब्रांचची टीम ट्रान्सफर वॉरंटसह तळोजा जेलमध्ये आली. पोलीस निरीक्षक संजय शिंदे हेच ते PI आहेत, ज्यांनी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. संजय शिंदेंच्याच गोळीनं अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. पोलीस व्हॅनमध्ये आरोपी अक्षय शिंदेंसह मागच्या बाजूला पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे आणि 2 पोलीस अंमलदार होते. ड्रायव्हरच्या बाजूला पोलीस निरीक्षक संजय शिंदे बसले होते. सोमवारी संध्याकाळी साडे 5 वाजता आरोपी अक्षय शिंदेला घेवून ठाणे क्राईम ब्रांचची टीम तळोजा जेलमधून निघाले. काही अंतरावर गाडी गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरेंनी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले पोलीस निरीक्षक संजय शिंदेंना फोन केला. निलेश मोरेंनी संजय शिंदेंना सांगितलं की, आरोपी अक्षय शिंदे शिवागीळ करतोय. मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेवून जात आहात, आता मी काय केलं आहे, असं रागानं अक्षय शिंदे बोलतोय त्यानंतर गाडी थांबवून पोलीस निरीक्षक संजय शिंदे मागच्या बाजूला बसले आणि अक्षय शिंदेला शांत करण्याचा प्रयत्न केला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 25, 2024 11:28 AM