‘एकच वादा अजित दादा’, आता कुठे झळकले भावी मुख्यमंत्रीचे बॅनर्स; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू
VIDEO | अजित पवार यांचे सासूरवाडीपासून मुंबई,नागपूरनंतर आता कुठे बॅनरबाजी; राजकीय वर्तुळात पुन्हा होतेय चर्चा
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. कारणही तसेच आहे, अजित पवार यांच्या सासूरवाडी तेरच्या चौकाचौकापासून मुंबई ते राज्याच्या उपराजधानीतंही ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का’ अशी बॅनरबाजी नागुपरात पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा अजित दादा पवार भावी मुख्यमंत्री असे मिरा भाईंदर शहरात बॅनरबाजी कार्यकर्त्यांकडून केल्याचे पाहायला मिळाले. मिरा भाईंदर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी राकापाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आशिफ शेख यांच्याकडून अजित पवार भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी केल्याचे समोर आले आहे. तर राष्ट्रवादीच्या या बॅनरची मिरा भाईंदर शहरात जोरदार चर्चा सुरूये. अजित दादा पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे असे कार्यकर्त्यांची इच्छाच नाही तर त्यावर एकच वादा अजित दादा, अजित दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है… असा उल्लेखही बॅनरवर करण्यात आला आहे.