Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा ताण पूर्णपणे कुणी कमी केला?
दहीसर नदीचे काम असो की अजून काम. हा माझा पूर्ण ताण आता आदित्यने कमी केला आहे. तो रात्री, अपरात्री सर्वांसोबत नगरसेवक, महापालिका अधिकारी यांच्यासोबत बाहेर जातो. कामांची पाहणी करतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच जाहीर कौतुक केले.
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंबईकरांना एक मोठे गिफ्ट दिले. ते म्हणजे मुंबईतील 500 चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत 16 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी त्यांचा ताण कमी करणाऱ्या एका विशेष सहकाऱ्याचे पहिल्यांदा नाव जाहीर केले. त्यांचे तोंड भरून कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी सुद्धा रस्त्याची कामे मध्यरात्री जाऊन पाहिली. नालेसफाई नाल्यात उतरून पाहिली. दहीसर नदीचे काम असो की अजून काम. हा माझा पूर्ण ताण आता आदित्यने कमी केला आहे. तो रात्री, अपरात्री सर्वांसोबत नगरसेवक, महापालिका अधिकारी यांच्यासोबत बाहेर जातो. कामांची पाहणी करतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच जाहीर कौतुक केले.