227 वॉर्डनुसार निवडणूक घेण्याच्या निर्णयाला स्थगिती
ही निवडणूक बेकायदेशीर असल्याची याचिका सुर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देताना हा निर्णय देण्यात आला आहे.
मुंबई : महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi)सरकारने वॉर्ड रचनेत बदल केला होता. पण त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडी सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आलं. नवं सरकार सत्ते आल्यानंतर त्यांनी 2017 साली असलेल्या 227 वॉर्ड प्रमाणे निवडणुका घेतल्या जाव्यात, असा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान देण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पालिकेच्या (BMC Election 2022) 227 वॉर्डनुसार निवडणूक घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. ही निवडणूक बेकायदेशीर असल्याची याचिका सुर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देताना हा निर्णय देण्यात आला आहे.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
