अवघ्या काही तासात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार, निवडणूक तारखांची आज घोषणा

अवघ्या काही तासात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार, निवडणूक तारखांची आज घोषणा

| Updated on: Mar 16, 2024 | 12:50 PM

अवघ्या काही तासात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार असून यासंदर्भातील निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. त्यामुळे आज दुपारपासूनच आचारसंहिता लागणार आहे. एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता

नवी दिल्ली, १६ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकीसंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे. आज दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणूक आयोगाची मोठी घोषणा होणार आहे. अवघ्या काही तासात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार असून यासंदर्भातील निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. त्यामुळे आज दुपारपासूनच आचारसंहिता लागणार आहे. दरम्यान, एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज दुपारी ३ वाजता लोकसभा आणि ४ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर देशभर आचारसंहिता लागू होणार आहे. २०१९ च्या तुलनेत यावेळी निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेला ६ दिवस उशीर झालेला असून घोषणेपूर्वी भाजपने २६७, काँग्रेसने ८२ उमेदवारांची घोषणा केली आहे.

Published on: Mar 16, 2024 12:50 PM