Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Election That Surprised India : छगन भुजबळांचा खळबळजनक दावा, 'ईडीपासून सुटका म्हणजे माझ्यासाठी पुनर्जन्मच अन्...'

The Election That Surprised India : छगन भुजबळांचा खळबळजनक दावा, ‘ईडीपासून सुटका म्हणजे माझ्यासाठी पुनर्जन्मच अन्…’

| Updated on: Nov 08, 2024 | 1:10 PM

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात नमूद करण्यात आल्यानुसार ईडीपासून सुटका व्हावी यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली. ईडीपासून सुटका झाली त्यामुळे भाजपसोबत केल्याचा सर्वांना आनंद आहे, मंत्री छगन भुजबळ यांनी The Election That Surprised India पुस्तकात हा मोठा दावा केल्याचा उल्लेख आहे. २०२४ ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात हा उल्लेख करण्यात आला आहे. तर ईडीपासून सुटका हा पुनर्जन्मच, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात छगन भुजबळ असे म्हणाले की, ‘अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता.’ पुढे भुजबळ असेही म्हणाले की, दोन-अडीच वर्ष तुरूंगात काढल्यानंतर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरं जायचं असा प्रश्न होता. असा दावा या पुस्तकात करण्यात आलाय.

Published on: Nov 08, 2024 12:58 PM