खास उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्रतिज्ञापत्राचा अहमदनगर ते मातोश्री प्रवास !

खास उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्रतिज्ञापत्राचा अहमदनगर ते मातोश्री प्रवास !

| Updated on: Jul 27, 2022 | 2:02 PM

वाढदिवसानिमित्त मला गिफ्ट नको प्रतिज्ञापत्र द्या असं आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं होतं. अहमदनगर वरून शिवसैनिक उद्धव ठाकरेंना द्यायला चक्क प्रतिज्ञापत्र घेऊन आलेत.

मुंबई: वाढदिवसानिमित्त मला गिफ्ट नको प्रतिज्ञापत्र द्या असं आवाहन शिवसेना प्रमुख (Shivsena) उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं होतं. अहमदनगर वरून शिवसैनिक (Ahemadnagar Shivsainik) उद्धव ठाकरेंना द्यायला चक्क प्रतिज्ञापत्र घेऊन आलेत. शिवसैनिकांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देतानाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. त्यामुळे त्यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात निष्ठा रॅली काढण्यात आलीये. फक्त मुंबईतच नाही तर कोल्हापुरात सुद्धा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा जल्लोष दिसून येतोय.

Published on: Jul 27, 2022 02:02 PM