Amit Shah | शिर्डी ही सहकाराची काशी, अमित शाह यांचं वक्तव्य
महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काढले. अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर (Pravara Nagar) इथं पहिल्या सहकार परिषदेत ते बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातर्फे सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, सुजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यातल्या सहकार क्षेत्राचे गुणगान गायले. बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) आणि धनंजयराव गाडगीळ (Dhananjay Gadgil) यांनी सहकाराची चळवळ रोवली. महाराष्ट्रात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी ही चळवळ उभी केली. महाराष्ट्रात हे होत असताना देशात अशाप्रकारे काहीतरी व्हावं, असं कोणालाही वाटलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीं(PM Narendra Modi)नी मात्र अशाप्रकारचं मंत्रालय तयार केलं, असं ते म्हणाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान