राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीवर विश्वराज महाडिक म्हणाले, 'आमचा विजय...'

राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीवर विश्वराज महाडिक म्हणाले, ‘आमचा विजय…’

| Updated on: Apr 01, 2023 | 4:30 PM

VIDEO | राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विश्वराज महाडिक मैदानात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाडिक परिवाराची तिसरी पिढी कोल्हापूरच्या राजकारणात एन्ट्री करत आहे. राजारामच्या प्रचारासाठी धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक मैदानात उतरले आहे. शेताच्या बांधावर जाऊन ते सभासदांच्या गाठीभेटी घेत असून सत्ताधारी आघाडीला मदतीचा आवाहन ते करत आहेत. ऊस तोडणी मजुरांची कमतरता कारखान्याचे विस्तारीकरण याबाबत सभासदही मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधताना दिसताहेत.. सभासदांच्या या प्रतिक्रिया पाहता आधारे आघाडीचा विजय निश्चित असल्याचा दावा विश्वराज महाडिक यांनी केला आहे. तर भविष्यातील राजकीय वाटचाली बाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केल आहे.

Published on: Apr 01, 2023 04:30 PM