भाजपचं 2024 पूर्वी काय होणार? संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य करत काय केली नवी भविष्यवाणी?
VIDEO | 'भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए म्हणजे नौटंकी आहे तर 2024 मध्ये भाजपही फुटलेला पक्ष असणार आहे', असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून राऊतांच्या भविष्यवाणीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले
मुंबई, २६ सप्टेंबर २०२३ | भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए म्हणजे नौटंकी आहे. तर 2024 मध्ये भाजपही फुटलेला असणार आहे, असे म्हणत भविष्यवाणी करणारे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी निर्माण झाल्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली. नंतर इकडून तिकडून लोकं घेतले आणि बैठक घेतली. शिवसेना आणि अकाली दल नसेल तर एनडीए शून्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले तर एनडीए अस्तित्वातच नाही ती नौटंकी असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांना ज्या गोष्टीत कल्याण वाटतं, 2024 साली त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे. इतकेच नाही तर संजय राऊत असेही म्हणाले की, 2024 मध्ये भाजपही फुटलेला असेल. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.