भाजप प्रदेश कार्यकारिणीत लवकरच होणार मोठे फेरबदल?
VIDEO | भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये लवकरच होणार मोठे फेरबदल, या नव्या कार्यकारिणीची घोषणा चंद्रशेखर बानवकुळे करणार?
मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारिणीत लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर भाजप प्रदेश कार्यकारिणीत झालेल्या मोठ्या फेरबदलाची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या नव्या भाजप प्रदेश कार्यकारिणी कोणाची वर्णी लागू शकते तर कोणाला डच्चू मिळू शकतो, याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची नवी भाजप प्रदेश कार्यकारिणी तयार झाली आहे. तर या आठवड्यातच या नव्या टीमची घोषणा देखील भाजपकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. अनेक जिल्हा अध्यक्षांचे खांदे पालट करण्यात येणार आहे आणि भाजप प्रदेश कार्यकारिणीत नवे चेहरे दिसणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारिणीची नवी टीम तयार करण्यात आली आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली नव्हती. तर गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यकारिणीतील सदस्यांच्या कामांचा आढावा घेत होते. त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेश कार्यकारिणीबाबत कोणती घोषणा करणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.