VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 14 June 2022
संजय राऊत हे सध्या अयोध्येच्या दाैऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांनी विरोधी आघाडीचं नेतृत्व केलं पाहिजे. देशात आणि विरोधी पक्षात त्यांच्यासारखा अनुभवी नेता नाहीये. पवारांनी या विरोधी आघाडीचं नेतृत्व केले पाहिजे. त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी उभे राहण्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवली तर या निकालात फेरफार होऊ शकतो. पवारांना मानणारा मोठा वर्ग खूप जास्त आहे.
संजय राऊत हे सध्या अयोध्येच्या दाैऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांनी विरोधी आघाडीचं नेतृत्व केलं पाहिजे. देशात आणि विरोधी पक्षात त्यांच्यासारखा अनुभवी नेता नाहीये. पवारांनी या विरोधी आघाडीचं नेतृत्व केले पाहिजे. त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी उभे राहण्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवली तर या निकालात फेरफार होऊ शकतो. पवारांना मानणारा मोठा वर्ग खूप जास्त आहे. राजकारणापलिकडे आणि पक्षाच्या पलिकडे आहे. हे सर्व लोक पवारांच्या मागे उभे राहतील, असे राऊत म्हणाले आहेत. उमेदवार मजबूत असावा. विरोधी पक्षाचा असला तरी हा चेहरा राष्ट्रपतीपदाचा असावा असं जनतेला वाटावं. तो उभा करणं महत्त्वाचा आहे. तसा चेहरा दिल्यास उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
Latest Videos