VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 16July 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 16July 2022

| Updated on: Jul 16, 2022 | 1:27 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. राऊतांची भक्ती किंवा निष्ठा उद्धव ठाकरेंशी किती आणि पवारांशी किती हे सर्वांना माहीत आहे. जे महाराष्ट्राला कळतंय, आमदारांना कळतंय ते राऊत आणि ठाकरेंना का कळत नाही? असा सवाल विजय शिवतारे यांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. राऊतांची भक्ती किंवा निष्ठा उद्धव ठाकरेंशी किती आणि पवारांशी किती हे सर्वांना माहीत आहे. जे महाराष्ट्राला कळतंय, आमदारांना कळतंय ते राऊत आणि ठाकरेंना का कळत नाही? असा सवाल विजय शिवतारे यांनी केला. तसेच राऊत यांची तुलना त्यांनी सिझोफ्रेनियाच्या रुग्णाशी केली. राऊतांना आपल्यालाच सर्व कळतंय असा भास झाला आहे. ते आपल्याच विचारांच्या गर्तेत असतात. त्यातूनच ते बेछूट विधाने करत आहेत. त्यामुळे पक्षाची अधोगती होत आहे, अशी टीका शिवतारे यांनी केली. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.

Published on: Jul 16, 2022 01:27 PM