VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 30 April 2022

| Updated on: Apr 30, 2022 | 12:17 PM

ज्यांनी हिंदुत्वाचे कातडे पांघरले आहे, हे कातडेही भाड्याचे आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर केली आहे. 1992ची दंगल विसरलात का, ज्यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान केले. अयोध्येच्या आंदोलनात शिवसेनेने केलेला त्याग ते विसरले का, आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही, ते आमच्या रक्तात आहे.

ज्यांनी हिंदुत्वाचे कातडे पांघरले आहे, हे कातडेही भाड्याचे आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर केली आहे. 1992ची दंगल विसरलात का, ज्यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान केले. अयोध्येच्या आंदोलनात शिवसेनेने केलेला त्याग ते विसरले का, आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही, ते आमच्या रक्तात आहे. आम्ही कोणालाही वापरू देत नाही. आमचा वापर होत आहे, असे वाटते त्यावेळी लाथ मारून स्वाभिमानाने बाहेर पडणारे शिवसैनिक आहोत. हिंदुत्वाचा अपमान होत आहे, हे लक्षात आल्यावर शिवसेना  युतीतून बाहेर पडली. त्यामुळे आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये, तुम्ही अडचणीत याल, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे. राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून संजय राऊत यांनी यावेळी नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या मेमरी कार्डमधली मेमरी डिलीट झाली आहे
VIDEO : Raj Thackeray रांजणगावकडे पोहोचले; 100 ते 150 गाड्याच्या ताफ्यासह औरंगाबादकडे रवाना