VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 02 August 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या पुणे दाैऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे अनेक उद्घाटन कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज प्रथमच पुणे दौऱ्यावर येत आहेत. शहरातील विविध विकासकामांचा आढावा ते घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या पुणे दाैऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे अनेक उद्घाटन कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज प्रथमच पुणे दौऱ्यावर येत आहेत. शहरातील विविध विकासकामांचा आढावा ते घेणार आहेत. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार असून यात पाऊस, अतिवृष्टी, पिकपाण्याच्या आढाव्या बरोबरच शहर आणि जिल्ह्यातील विकासकामांच्या प्रगतीचा आलेख मांडला जाईल. या बैठकीनंतर ते सासवड, जेजुरी, पुरंदर आणि हडपसर-धनकवडी अशा विविध ठिकाणी भेटी देणार असून विकास कामांचं लोकार्पण ते करणार आहेत. पुरंदर येथे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी देखील करण्यात आलीयं.
Published on: Aug 02, 2022 10:10 AM
Latest Videos