सातारकरांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाकडे जाणारी तराफा सेवा पुन्हा
VIDEO | साताऱ्यात पर्यटनाला मिळणार मोठी चालना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाकडे जाणारी तराफा सेवा पुन्हा सुरू कारण...
सातारा, 4 ऑगस्ट, 2023 | सातारकरांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी आहे. कारण साताऱ्यात आता पुन्हा तराफा सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाकडे जाणारी तराफा सेवा कोयना जलाशयात मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे पुन्हा सुरू करण्यात आली आहे.कोयना जलाशयात मागील तीन महिन्यापासून पाणीसाठा नसल्यामुळे ही तराफासेवा बंद करण्यात आली होती. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात येते. मात्र यावर्षी पाणीसाठ्यात वाढ विचारात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 दिवस आधीच तराफा सुरू करण्याच्या सूचना दिल्यामुळे तापोळा- तेटली आणि दरे या गावाचे या तरफ्याच्या माध्यमातून दळणवळण सुरू झाल आहे. यामुळे भागातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.
Published on: Aug 04, 2023 08:35 AM
Latest Videos