सिंधुदुर्गातील पांढराशुभ्र फेसाळणाऱ्या बाबा धबधब्याची पर्यटकांना भुरळ, बघा नयनरम्य नजारा

सिंधुदुर्गातील पांढराशुभ्र फेसाळणाऱ्या बाबा धबधब्याची पर्यटकांना भुरळ, बघा नयनरम्य नजारा

| Updated on: Aug 06, 2023 | 3:44 PM

VIDEO | पांढराशुभ्र फेसाळत उंचावरून कोसळणारा बाबा धबधबा पाहण्यासाठी पर्यटनप्रेमींची मोठी झुंबड, बघा नयनरम्य दृश्य

सिंधुदुर्ग, ६ ऑगस्ट २०२३ | पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांना वेध लागतात ते वर्षा सहलीचे…निसर्गाच्या किमयामुळे निसर्गनिर्मित अनेक धबधबे दऱ्या-खोऱ्यात प्रवाहित होताना दिसतात आणि हेच धबधबे पर्यटकांना खुणावत असतात. असाच एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीपासून जवळच असलेल्या कुभवडे गावात एक असा नयनरम्य धबधबा आहे. हा धबधबा जो दोन्हीं बाजूंनी पाहता येतो, त्यामुळे पर्यटक आकर्षित होत आहेत. माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या खाजगी मालकीच्या जागेत असलेला कुंभवडे गावातील हा बाबा धबधबा पर्यटकांना भूरळ घालत आहे. या धबधब्याचं सौंदर्य दोन्ही बाजूंनी पाहता येतं. या धबधब्याचं आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून किंवा समोरुन अशा दोन्ही बाजूंनी डोळ्यादेखत पांढराशुभ्र फेसाळत कोसळताना धबधबा पाहायला मिळतो.या धबधब्याची पर्यटकांना मोठी भुरळ पडली असून दर वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी उसळून येते.

Published on: Aug 06, 2023 03:44 PM