विरोधकांच्या आघाडीला मोठं भगदाड, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर अन्…
विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला हा मोठा झटका दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल पश्चिम बंगालमधून स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला हा मोठा झटका दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्षासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही. पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार हे सुरूवातीपासून आम्ही सांगतोय. आमचा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. आम्ही स्वबळावर भाजपला हरवू शकतो, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून 10 ते 12 जागांची मागणी करण्यात येत होती. पण टीएमसी केवळ दोन जागा द्यायला तयार होती, पण काँग्रेसला हे मान्य नव्हतं आणि ही चर्चा इथेच फिस्कटल्याचे समोर आले.