तुळजाभवनीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, मंदिरातील ड्रेस कोड प्रकरणी संस्थानचा ‘यु टर्न’
VIDEO | तुळजाभवानी मंदीर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न, ड्रेस कोड प्रकरणी बंदी हटवली!
धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी ड्रेस कोडची नियमावली तयार करण्यात आल्याचे समोर आले होते आणि अवघ्या काही तासात तुळजाभवानी मंदीर संस्थानने या निर्णयावरुन यु टर्न घेतल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, तुळजाभवानी मंदिर परिसरात याबाबत फलकही लावण्यात आले होते. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्रीचा निर्णय घेण्यात होता. याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. पण या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी दुपारी मंदिर प्रशासनाने मंदिरात तोडक्या कपड्याने जाता येणार नाही, असा निर्णय अचानक घेतला. त्यासंदर्भातील फलक लावण्यात आले. गुरूवारी दुपारीनंतर वेस्टर्न कपडे किंवा तोडके कपडे असणाऱ्या कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. परंतु यानंतर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घालणाऱ्यांना काल नो एन्ट्री होती. त्याबाबत बॅनर सुद्धा लावले होते. मात्र तो निर्णय मागे घेतला असून बॅनर काढले आहेत. अवघ्या 7 तासात मंदिर संस्थांनाने भूमिका बदलत निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.