टीव्ही 9 मराठी महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनेल, टीव्ही 9 च्या ऑफिसमध्ये जल्लोष!
महाराष्ट्रात (Maharashtra) ‘टीव्ही 9 मराठी’चा (tv9 Marathi) दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तब्बल 74 आठवड्यांनंतर बार्कने रेटिंग जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ अव्वल ठरली आहे. ऐन होळीच्या दिवशी ‘टीव्ही 9 मराठी’ने रंगांची उधळण केली आहे. 29 रेटिंग मिळवत ‘टीव्ही 9 मराठी’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी वृत्त […]
महाराष्ट्रात (Maharashtra) ‘टीव्ही 9 मराठी’चा (tv9 Marathi) दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तब्बल 74 आठवड्यांनंतर बार्कने रेटिंग जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ अव्वल ठरली आहे. ऐन होळीच्या दिवशी ‘टीव्ही 9 मराठी’ने रंगांची उधळण केली आहे. 29 रेटिंग मिळवत ‘टीव्ही 9 मराठी’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’चं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ हे रशिया-युक्रेनच्या युद्धभूमीवर पोहोचणारे पहिले मराठी न्यूज चॅनेल ठरले होते. युद्धापासून महाराष्ट्रातील राजकीय बातम्या, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल, यांचे सुपरफास्ट अपडेट्स ‘टीव्ही 9 मराठी’ने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळेच प्रेक्षकांनीही आपल्या प्रेमाची पोचपावती म्हणून ‘टीव्ही 9 मराठी’वर पसंतीची मोहोर उमटवली आहे. यानिमित्त टीव्ही 9 ऑफिसमध्ये आनंदाचं वातावरण होतं. सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन करत हा आनंद साजरा केला.