UdayanRaje Bhosale : भारतात लांब कानाचे कुत्रे तरी आहेत का? रायगडावरील ‘वाघ्या’ला फेकून द्या… उदयनराजेंचा संताप अन् हाकेंचा थेट इशारा
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाला फेकून द्या असा संताप खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला. भारतात लांब कानाचे कुत्रे तरी आहेत का असं म्हणत उदयनराजे यांनी कुत्र्याच्या शिल्पाला हटवण्याची मागणी केली. त्यावरून तुमच्या नावावर महाराष्ट्राचा सातबारा आहे का असं लक्ष्मण हाके म्हणाले.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून उदयनराजे चांगलेच भडकले आहेत. वाघ्या कुत्र्याला फेकून द्या लांब कानाचे कुत्रे भारतात आहेत का हा ब्रिटीश कुत्रा आहे असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे. वाघ्याला फेकून द्या म्हणताच ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी महाराष्ट्र सातबारा तुमच्या हातात आलाय का असा सवाल करून वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचं समर्थन केला आहे. याआधी छत्रपती संभाजीराजेंनी देखील वाघ्याला हटवण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर वाद न करता बसून मार्ग काढला पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. वाघ्यावरून धनगर आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभे होण्याचं कारण नाही वाद नको असं मुख्यमंत्री म्हणाले. तर वाघ्याचं शिल्प हटवण्याची मागणी होताच लक्ष्मण हाके यांनी विरोध करताना नेमकं काय कारण दिल आहे ते ही ऐका. श्वान आणि धनगर समाजाच वेगळ नात आहे. वाघ्या कुत्र्याच शिल्प धनगर समाजाच्या अस्मितेचं आणि भावनेच प्रतिक आहे. त्यामुळे वाघ्याला हटवू नका नाहीतर आंदोलन करू आणि कोर्टात ही जाऊ असे हाके यांनी म्हटले आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर

