म्हणून लोकं माझं पेन्टिंग काढतात, उदयनराजे भोसले यांनी काय लगावला शिवेंद्र राजे यांना टोला
VIDEO | 'तुम्ही पण लोकांची सेवा केली तर...' उदयनराजे भोसले यांनी काय दिला शिवेंद्र राजे यांना सल्ला, बघा व्हिडीओ
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी पोवई नाक्यावर त्यांचे काढलेल्या पेंटिंगवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पेंटिंग बाबत चर्चा मला प्रसारमाध्यमांमधून समजले. पेंटिंग प्रकरणावरून कोणताही वाद झालेला नाही. यामध्ये किरकोळ गैरसमज झाला होता. मात्र वाद वगैरे काही नाही, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तरही दिले आहे. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांचे चित्र संपूर्ण अजिंक्यतारा किल्ल्यावर काढायला हरकत नाही, अशी खोचक टीका केली होती, यावर उदयनराजेंनी देखील त्यांची एवढी इच्छा असेल तर विचार करायला हरकत नाही असे म्हटले. इतकेच नाही तर लोकांचे प्रेम असल्यामुळे लोक माझे पेंटिंग काढतात. तुम्ही पण लोकांची सेवा केली तर तुमचे पण लोक पेंटिंग काढतील. असा मजेशीर सल्ला त्यांनी आमदार शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता दिला आहे.