लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर अन् हनिमून… उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
शिवसेना पळवणाऱ्या राजकीय बालीचा वध करणार, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी इशारा दिलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय. राम कोण आणि रावण कोण हे जनतेला माहित आहे. असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : नाशिकच्या अधिवेशनातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिवसेना पळवणाऱ्या राजकीय बालीचा वध करणार, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी इशारा दिलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय. राम कोण आणि रावण कोण हे जनतेला माहित आहे. तुम्हाला लोकं का सोडून गेले याचं आत्मपरिक्षण करा, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. यावरून बोलताना उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेना मला वडिलोपार्जित मिळाली असून चोरून मिळाली नाही, असे घणाघात त्यांनी केला. तर लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर अन् हनिमून तिसऱ्याबरोबर असं वक्तव्य करत खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

