येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण एका…काय म्हणाले उद्धव ठाकरे
शिवसेनेतर्फे मुंबईत रोजगार मेळावा झाला. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ला केला. एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, दीड महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले गद्दार बेकार होणार आहेत. परंतू या गद्दारांना आपण निक्षून सांगतो की एकालाही रोजगार मिळणार नाही असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
एका बाजूला पंतप्रधान येत आहेत कॉन्ट्रक्टरचे खिसे भरायला येत आहेत परंतू सर्वसामान्यांच्या घरातील चूल पेटत नाही. यांचे हिंदुत्व म्हणजे दंगली भडकवून एकमेकांची घरे पेटवण्याचे असल्याची टीका शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. भारतीय कामगार सेनेने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. मोदी आपल्याला जेवढ्या फित्या कापतात तेवढा कापा, एक दीड महिन्याने हे गद्दार बेकार होणार आहेत. या गद्दारांना मात्र मी रोजगार देणार नाही. आज तु्म्ही प्रकल्पाच्या घोषणा करीत आहात. परंतू प्रत्यक्षात एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुलगी झाली प्रगती झाली आणि 1500 रुपये देऊन घरी बसविली अशी सरकारची अवस्था असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी सांगितले.
Published on: Oct 05, 2024 01:28 PM
Latest Videos