शिवरायांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं चूक : Uddhav Thackeray
बेवड्यांचा महाराष्ट्र, मद्य महाराष्ट्र म्हणाला तुम्ही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे किराणा दुकानात मद्य मिळत नाही. ते सुपर मार्केटमध्ये मिळतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सुधीर भाऊ तुम्ही छान बोलता. मला उत्तर द्यावं लागतं. बेवड्यांचा महाराष्ट्र, मद्य महाराष्ट्र म्हणाला तुम्ही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे किराणा दुकानात मद्य मिळत नाही. ते सुपर मार्केटमध्ये मिळतं. मध्य प्रदेशला मद्य राष्ट्र का म्हणतात? देशात एकलाखापेक्षा कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहे. कर्नाटकात 7.10 टक्के, मध्य प्रदेश 5.07 टक्के, उत्तर प्रदेशात 2.60 टक्के, तेलंगणामध्ये 6.30 टक्के, तामिळनाडूत 9.30 टक्के दुकाने आहेत. हे सगळं बघितल्यानंतर लगेच राज्याची बदनामी करायची हे योग्य नाही. तुम्ही आमच्यावर टीका करा. राज्यपाल विकास काय हे सांगत होते. तेही तुम्ही समोर येऊ देत नाही. एक एक नाव देऊन राज्याला बदनाम करत असतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Latest Videos