‘उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांनी हिंदुत्वाचा…’, कालीचरण महाराज यांनी नेमकं काय म्हटलं?
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासारखे हिंदुत्ववादी राजकारणी समाजात आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याकरता आज कावड यात्रेत सहभागी झाल्याचे कालीचरण महाराज यांनी म्हटले.
हिंगोली, २८ ऑगस्ट २०२३ | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासारखे हिंदुत्ववादी राजकारणी समाजात आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याकरता आज कावड यात्रेत सहभागी झाल्याचे कालीचरण महाराज यांनी म्हटले. दरवर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीत कावड यात्रा काढली जाते . गेल्या सहा वर्षांपासून ही कावड यात्रा काढली जात असून कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत यात्रा काढली जाते. यंदा या कावड यात्रेत प्रमुख उपस्थिती कालीचरण महाराज यांची राहणार असल्याची माहिती गेल्या दोन दिवसांपूर्वीच संतोष बांगर यांनी दिली होती. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची सभा देखील आज हिंगोलीत होत आहे. यावरून कालीचरण महाराज यांना विचारले असता ते म्हणाले, आपला भारत देश हा हिंदुत्ववादी देश बनला पाहिजे याकरता मी अतोनात प्रयत्न करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडलेला आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार? संतोष बांगर किंवा हिंदुत्ववादी विचारांना पाठिंबा देणारे कोणतेही राजकारणी त्याचं चारित्र कसंही असलं तरी त्यांना आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार म्हणून पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.