Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात…
uddhav thackeray on Cm Ladki Bahin Yojana : घरातील मुलींना मोफत शिक्षण मग मुलांना का मोफत शिक्षण दिले जात नाही, असा सवाल उद्धव ठाकरे म्हणाले, मुलींना मोफत शिक्षणाची सोय पण भाऊ बेकार फिरतोय. आमचा पक्ष फोडला, पवारांचं कुटुंब फोडलं आता जनतेची कुटुंब फोडत आहे, असा थेट आरोपच सरकारवर केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसंकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर प्रथमच भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. योजनेचे नाव न घेता माता भागिनींवर डाव टाकून फसवण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपच उद्धव ठाकरे यांनी केला. सरकार योजना आणून घरातील बहीण-भावामध्ये वितुष्ट आणतंय, असा हल्लाबोलच उद्धव ठाकरेंनी सराकारवर केलाय. घरातील मुलींना मोफत शिक्षण मग मुलांना का मोफत शिक्षण दिले जात नाही, असा सवाल उद्धव ठाकरे म्हणाले, मुलींना मोफत शिक्षणाची सोय पण भाऊ बेकार फिरतोय. आमचा पक्ष फोडला, पवारांचं कुटुंब फोडलं आता जनतेची कुटुंब फोडत आहे, असा थेट आरोपच सरकारवर केला आहे. निवडणूकमध्ये पापे लपवण्यासाठी आता सरकार योजना आणत आहेत. योजना आणा, पण आरक्षण द्या. महाराष्ट्राचे हक्काचे आरक्षण द्या. सर्व समाजाने आता त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी एकत्र आले पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.