प्रायश्चित्त घेणार की नाही?; ओडिशातील ट्रेन दुर्घटनेवर 'सामना'तून केंद्राला थेट सवाल

प्रायश्चित्त घेणार की नाही?; ओडिशातील ट्रेन दुर्घटनेवर ‘सामना’तून केंद्राला थेट सवाल

| Updated on: Jun 05, 2023 | 9:27 AM

VIDEO | बालासोर रेल्वे अपघाताच्या घटनेवरुन सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल अन् केला सवाल

मुंबई : ओडिसामधल्या बालासोरमध्ये 2 जूनला भीषण रेल्वे अपघात झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत तब्बल 275 लोकांचा मृत्यू झालाय. यावर आजच्या सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून भाष्य करण्यात आला आहे. नुकसानभरपाईच्या रकमा आणि सहवेदना हे ना या प्रश्नाचे उत्तर आहे ना प्रायश्चित्त. या भीषण आणि भयंकर दुर्घटनेचे प्रायश्चित्त सरकार घेणार की नाही? असा सवाल करत सामनातून केंद्र सरकारला थेट सवाल करण्यात आला आहे. ‘तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा घसरलेले डबे यावर खापर फोडून सरकारला बालासोर रेल्वे दुर्घटनेच्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. अपघात हा अपघात असतो असे म्हणून हातही वर करता येणार नाहीत. पंतप्रधानांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली, जखमींची विचारपूस केली, सांत्वन केले, मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांना धीर दिला, हे सगळे ठीक असले तरी सरकार म्हणून तुमच्या उत्तरदायित्वाचे काय? नुकसानभरपाईच्या रकमा आणि सहवेदना हे ना या प्रश्नाचे उत्तर आहे ना प्रायश्चित्त. या भीषण आणि भयंकर दुर्घटनेचे प्रायश्चित्त सरकार घेणार की नाही? अपघातग्रस्तांच्या किंकाळय़ा, आक्रोश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फोडलेला टाहो हाच सवाल करीत आहे.’ असे अग्रलेखात म्हटले आहे.

Published on: Jun 05, 2023 09:27 AM