रायगडावरील ‘वाघ्या’ला ऐतिहासिक महत्त्व की फक्त दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
वाघ्या कुत्र्यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत आणि हा कुत्रा ऐतिहासिक आहे की मग फक्त एक दंतकथा आहे यावरून अनेक वर्षांपासून खल रंगतोय. त्यातच आता इंदूरचे राजे होळकर यांचे वंशजही समोर आलेत त्यांनी याबद्दल नेमकी काय भूमिका मांडलेली आहे.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरू चांगलाच वाद रंगतोय यापू्र्वीच्या वादात संभाजी भिडे तोंड बंद करून बसले होते का? अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांवर केली आहे. वाघ्या कुत्र्याच्या वादात संभाजी भिडे यांनी उडी घेतल्यानंतर या वादाला अजूनच फाटे फुटले. संभाजी भिडे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान द्वारे आपलं कार्य चालवतात. शिवराय आणि संभाजीराजे यांचा जाज्वल्य इतिहासाचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय असल्याचं सांगितलं जातं. मात्र शिवरायांचा कुत्र्याला त्यावेळी संभाजी भिडेनी भूमिका घेतल्याचं समोर आलं नाही. सोलापूरकर शिवराय आणि आंबेडकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली त्यावर भिडे बोलले नाहीत. कोरटकरने शिवराय आणि संभाजीराजांबद्दल अवमानकारक शब्द वापरले तेव्हाही भिडे मौन राहिले. मात्र शिवरायांच्या समाधीच्या बाजूच्या वाघ्या कुत्र्याचा वाद पुन्हा एकदा उभा राहिल्यानंतर भिडेनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांना कुणाल कामरानी गद्दार म्हटलं म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका मांडली आणि शिवाजीराजांचं कार्य हे केवळ हिंदूंसाठीच होतं हे सुद्धा आवर्जून सांगितलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..

गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ

कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
