मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम आज संपणार, काय घेणार भूमिका? चक्रव्युहात शिंदे सरकार

मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम आज संपणार, काय घेणार भूमिका? चक्रव्युहात शिंदे सरकार

| Updated on: Oct 24, 2023 | 8:41 AM

tv9 Marathi Special Report | धीर धरा, थोडा वेळ द्या काम सुरू आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला म्हटलं असताना आरक्षण न मिळाल्यास २५ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण करणार असल्याचे म्हणत १ तासही अधिकचा मिळणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा कडक इशारा

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | गेल्या दोन महिन्यांपासून जरांगे पाटील केंद्रस्थानी आलेत. मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण द्या, असा जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. सरकारच्या विनंतीनुसार, जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आणि ही मुदत आज संपतेय. त्यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय असणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. तर मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनी धीर धरा असे म्हणत वेळ वाढवून द्या, असे म्हटले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी टिकणारं आरक्षण देऊ असं म्हणत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यासह ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे यांचा याला विरोधही तेवढाच कायम आहे. तर सरकारचे मंत्री नारायण राणे आणि रामदास कदम यांनी उघडपणे विरोध केला. तर यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. बघा काय केला आरोप आणि सरकारची नेमकी भूमिका काय?

Published on: Oct 24, 2023 08:41 AM